police varata

Andhra Pradesh gang busted for robbing bank account holders

Police Commissioner Milind Bharambe

बँक खातेदारांना लुटणा-या आंध्र प्रदेशच्या टोळीचा पर्दाफाश
नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ ची दौंडमध्ये कारवाई
नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील ८ गुन्ह्यांची उकल

नवी मुंबई : बँकांबाहेर पाळत ठेवून खातेदारांना लुटणाºया आंध्र प्रदेशाच्या (Andhra Pradesh gang) टोळीच्या मोहरक्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष ३ च्या (Navi Mumbai Police Force Crime Branch Cell 3) पथकाने दौंड येथे केली. या कारवाईमुळे नवी मुंबईतील ७ तर ठाणे जिल्ह्यातील एका गुन्ह्याची उकल झाली.


गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई शहरात बँक खातेदारांना (To bank account holders in Navi Mumbai city) लुटण्याच्या व कारच्या काचा फोडून मुद्देमाल चोरीला जाण्याच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली होती. अशाच प्रकारे तळोजा पोलीस (Taloja police) ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे २ लाख रुपये चोरांनी पळवले. वारंवार घडणाºया गुन्ह्यांमुळे लुटारूंची टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त करत त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ३ चे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले.(Police Commissioner Milind Bharambe) तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या तांत्रिक माहितीमुळे आरोपी दौंड येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दौंडमध्ये सापळा लावून आरोपी प्रवीण गोगुला (२३, रा. आंध्रप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांच्या २ युनिकॉर्न, ८१ हजारांची रोकड, १२ हजार रुपयांचे २ मोबाईल असा एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उघडकीस आलेले गुन्हे

तळोजा : गु. र. क्र. ६७ / २०२४ भादंवि कलम ३७९, गु. र. क्र. ९२/२०२४ भादंवि कलम

कळंबोली : गु. र. क्र.११४ /२०२३ भादंवि कलम ३७९,४२७, गु. र. क्र. १७७ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३४, गु. र. क्र. ४८ / २०२४ भादंवि कलम ३९२, ३४

खारघर : गु. र. क्र. ४१२/२०२३ भादंवि कलम ३९२, ३४

पनवेल : गु. र. क्र. ६६२ /२०२३ भादंवि कलम ३७९

मानपाडा (ठाणे पोलीस आयुक्तालय) : गु. र. क्र. ३५० / २०२४ भादंवि कलम ३७९

कारवाई करणारी टीम

ही कारवाई सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त अमित काळे, एसीपी अजयकुमार लांडगे, वपोनि हनिफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष चव्हाण, अनिल देवळे, पीएसआय आकाश पाटील, सुशील मोरे, अंमलदार प्रकाश मोरे, वैभव पाटील, सुधीर पाटील सचिन धनवटे, चेतन जेजुरकर, महेंद्र पाटील, दिनेश सावंत, राजेश मोरे, संतोष तांदळे, सपोउपनि सचिन सुभे, तुकाराम सोनवलकर यांनी केली. तब्बल सव्वा आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतल्याची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तपासी पथकाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!