मुंबई : सण असो वा उत्सव पोलीस बांधव, भगिणी कायम कर्तव्यासाठी सज्ज असतात. या काळात नागरिकांच्या आनंदावर विरजन येऊ नये म्हणून चोख बंदोबस्त राबवला जातो. असे असताना माहीम पोलीस वसाहतीत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम केल्यानंतरच इमारत क्रमांक ‘४ ब’ च्या शेजारी गोण्यांमध्ये दगड-माती व सिमेंट एकावर एक रचून ठेवले आहे. यामुळे मच्छर व धुळीचा त्रास होत असल्याच्या अनेकदा पोलीस कुटुंबियांनी तक्रारी केल्या मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही. एकीकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष होत आहे.

साहेब, आमचेही आरोग्य जपा…
आम्ही दिवस-रात्र कर्तव्यासाठी बाहेर असतो, मात्र आमचे कुटुंबिय घरी असते. घरातील बाथरूममध्ये पाणी तुबंत आहे. तर घराबाहेर अस्वच्छता आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबियांचे आरोग्य जपा, अशी कळकळीची विनंती पोलीस कुटुंबियांनी मुंबई पोलीस कुुटुंबप्रमुख विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर स्थानिक पोलीस कुटुंबियांनी ‘पोलीसवार्ता’ला दिली.
सॅड