लोहमार्ग गुन्हे शाखेने आरोपींना पुणे, मुंबईत ठोकल्या बेड्या
मुंबई : मूल होत नसलेल्या अंबरनाथच्या दाम्पत्यासाठी २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पुणे व मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या (Mumbai Railway Crime Branch) पथकाने केली. सुखरूप सुटका करून बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
असे पळवले बाळाला…
तक्रारदार हे पत्नी, २ महिन्यांच्या बाळासह झोपले होते. १७ डिंसेबर २०२३ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास बाळाला एका व्यक्तीने पळवले. दरम्यान दाम्पत्याला जाग आल्यावर बाळ चोरीला गेल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ बोरिवली लोहमार्ग (Mumbai Railway) पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा रजि नं. 1608/2023 भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा नोदविण्यात आला.
४०० हून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर…
या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात ताबडतोब बाळाचा शोध घेण्याच्या सूचना लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे ( mumbai Railway Police Commissioner Dr. Rabindra Siswe) यांनी दिले. त्यानुसार लोहमार्ग गुन्हे शाखेची सर्वच पथके आरोपींचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, मात्र ज्या ठिकाणाहून नेमके तेथेच सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. अखेर उर्वरित कॅमऱ्यांचे फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींच२ मागोवा घेतला असता बाळचोराबद्दल लोहमार्ग गुन्हे शाखेला समजले. त्यानुसार आरोपी आलम आब्बास काशीम शेख उर्फ राजा (वय 22 वर्षे, राह. रोड नं.02, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई मुळ राह. निजाम का पुर्वा, ता. सैनी, जि. सिरातु इलाहाबाद, राज्य उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत सर्व हकीगत सांगितली. त्या माहितीच्या आधारे आरोपी सय्यद हैदर इंतजार मेंहदी (रा. शिवाजीनगर, ‘गॉवडी, मुंबई याच्या मार्फतीने आत्माराम शशिकांत आजगावकर ( रा. अंबरनाथ) याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे बाळाला ताब्यात घेण्यात आले. त्या बाळास बाल कल्याण समितीमार्फत आईच्या ताब्यात देण्यात आले.
सय्यद हैदर इंतजार मेंहदी व आत्माराम शशिकांत आजगावकर हे परिचयाचे आहेत. आजगावकर याच्याकरिता बाळ चोरल्याचे तपासात निष्पन्न राह. अंबरनाथ याचा शोध घेतला असता, ते मिळुन आले. त्याच्याकडे केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, एसीपी राजेंद्र रानमाळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुददीन शेख, बोरिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीकृष्ण चव्हाण, दिपक शिंदे, गुन्हेशाखा, श्री. कांबळे, बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे सहापोउपनिरी राजेश भडाळे, गणेश हरिश्चंद्रे, रविद्र दरेकर, कृषणराव चव्हाण, पोहवा/प्रविणसिंग घार्गे, सुनिल कुभांर, विकास नलगे, अतुल साळवी, सुनिल खोत, सुदर्शन देशमुख, राकेश भामरे, सुरेश येल्ला, जयेश धोरात, सतिश फडके, शोएब शेख, वैभव शिंदे, मपोहवा/वृषाली मयेकर, रंजनी सानप, पोना/ मिलिंद पाटील, प्रमोद दिघे, मयुर पाटील, अमरसिंग वळवी, लक्ष्मण वळकुडे, चंद्रकात होळकर, पोशि/सुनिल मागाडे, सागर हिंगे, नितीन भराडे, स्वप्निल नांगरे, तसेच सायबर सेलचे सपोनि / मंगेश खांडे, पोना/सचिन निंबाळकर, विक्रम चावरेकर, पोशि/ अनिल राठोड यांनी केली.