३० हजारांसाठी तरुणाचा दगडाने ठेचून खून
नवी मुंबई गुन्हे शाखा ३ च्या पथकाकडून २४ तासात गुन्ह्याची उकल
नवी मुंबई : अवघ्या ३० हजार रुपयांसाठी एका तरुणाचा खून करणाºयाला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा उलगडा २४ तासांत नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ च्या (Navi Mumbai Crime Branch unit 3) पथकाने लावला.
अशा प्रकारे घडली घटना
नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील खारघर पोलीस (Kharghar Police) ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठाजवळील खारघर हिल परिसरात डोंगरामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी १ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये ६६/२०२४ नुसार अपमृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपासात या व्यक्तीला दगडाने ठेवून मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान इसमाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान खबºयाने सांगितले की, या घटनेपूर्वी मृतासोबत एक व्यक्ती फिरताना दिसून आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून कमल नथुराम ढोलपुरीया (वय ३६, रा. ठक्कर बप्पा कॉलनी, दोन नंबर पाडा, चेंबूर, मुंबई Thakkar Bappa Colony, Two Number Pada, Chembur, Mumbai मूळ राहणार बिखरख्या कला, बडी पादु थाना, तहसील – देगाना, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) याला नेहरू नगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मृताचे नाव विकास रामलाल बोरा असल्याचे सांगितले. विकास याने सहा महिन्यांपूर्वी ३० हजार रुपये घेतले होते. ही रक्कम तो परत करत नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात त्याचा खून केला, अशी कबुली आरोपी कलमने दिली.
आरोपीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
खुनाचा उलगडा होताच खारघर पोलिसांनी (गुन्हा रजि. कं. ३६४/२०२४) भारतीय न्याय संहिता कलम १०३, २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी कमल याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीवर नेहरूनगर पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. ११५/२००८) भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाई करणारे पथक
या गुन्ह्याचा तपास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, (Navi Mumbai Police Commissioner Milind Bharambe,) पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, एसीपी अजयकुमार लाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे वपोनि हनिफ मुलानी, सपोनि संतोष वव्हाण, सपोनि एकनाथ देसाई, पोउपनिरी आकाश पाटील, हवालदार सावंत, सुधीर पाटील, राजकुमार दुधाळ, पोलीस नाईक राजेश मोरे यांनी केला.