police varata

१७ वर्षीय मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक । A woman who procured prostitution from women including a 17-year-old girl was arrested

पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी यांच्यामुळे गुन्ह्याची उकल

मुंबई : अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी (Police Sub-Inspector Anjali Vani) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी केली. या कारवाईत १७ वर्षीय मुलीची व २ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी दिल्या आहेत. त्यानुसार डी.एन.नगरचे (DN Nagar Police) पोलीस गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवू लागले. पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार अंधेरीतील एका हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला. वेश्यागमनासाठी मुलीला व महिलेला घेऊन येताच पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी गु.र.क्र.- 1117/2024 कलम-96,98,143(3),143(4) BNSS सह कलम 16,17,18 पोस्को अधिनियम सह कलम4,5 PITA , सह कलम 81,87 J J Act नुसार गुन्हा दाखल करून दलाल महिलेला अटक केली.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर, पो.नि.विशाल खैरे, पो.उप.नि. वाणी, हवालदार चव्हाण, गावडे, लाड, दगडे, महिला अंमलदार बारिया यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!