police varata

A man commits suicide in Mumbai due to sextortion | सेक्सटॉर्शनला वैतागून मुंबईत एकाची आत्महत्या

santacruz police | sextortion


सांताक्रूझ पोलिसांनी दोघांना राजस्थानमध्ये ठोकल्या बेड्या

मुंबई : सेक्सटॉर्शनला (sextortion) वैतागून मुंबईत एका व्यक्तीने मुंबईत आत्महत्या (suicide) केली. या प्रकरणात सांताक्रूझ पोलिसांनी (Santacruz Police) दोन जणांना राजस्थानमध्ये बेड्या ठोकल्या. तसेच या गुन्ह्यात १६ वर्षीय मुलाचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आाहे. या आरोपींनी त्या व्यक्तीचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग करून सतत पैशांची मागणी केली. यालाच वैतागून त्या व्यक्तीने टोकाची भूमिका घेतली.

लुटण्यासाठी ‘सेक्स’चा फंडा

  • सध्या विविध कारणांनी नागरिकांना लुटले जात आहेत. या कारणांमध्ये ‘सेक्स’चा फंडा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. याच फंड्याला मुंबईतील सुखीराम (काल्पनीक नाव) बळी पडले. त्यांना ७ आॅगस्ट २०२३ रोजी अनोळखी नंबरहून फोन आला. व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांना नग्नावस्थेतील रेकॉर्डिंग (Recording them naked through video calling) दाखवण्यात आले. या व्हिडीओच्या आधारे आरोपींनी सुखीराम यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. बदनामीला घाबरून सुखीरामांनी ७ ते ९ आॅगस्टदरम्यान ५६ हजार रुपये आरोपींना ट्रान्सफर केले. एवढे पैसे दिल्यानंतर आरोपींचा पैशांसाठी तगादा सुरू होता. अखेर वैतागून सुखीराम यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी (गु.र. क्र. 940/2023 कलम 384, 306, 419, 420 भादवी 66 क, 66 ड आयटी अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल केला.

अशा प्रकारे आरोपींचा शोध

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त परमजित सिंग दहिया, परिमंडळ ९ चे उपायुक्त कृष्णकान्त उपाध्याय, एसीपी महेश मुगुटराव, वपोनि राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार, हवालदार जयेश फाटक, अंमलदार मारुती गावडे, प्रसाद यादव, सावंत यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथील भरतपूर व डीग येथे ५ दिवस तळ ढोकला आणि आरोपी तोहिद जाफर अली (22) वारीस जाफर अली (19, दोघेही राहणारे ग्राम लेवडा, थाना – कामा , जिल्हा – डीग, राज्य – राजस्थान) यांना अटक केली. तसेच १६ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईलसह इतर ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि अमर पाटील करत आहेत.

यांचाही तपासात मोलाचा सहभाग…
सायबर प्रतिबंधक विभागाचे पोउपनि दत्तात्रय खाडे, अंमलदार प्रवीण सुरवसे, गणेश हंचनाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!