राष्ट्रीय तायक्वांदोत CISF कन्या रितीका नार्वेकर हिचे उत्तम कामगिरी
पणजी : इंडिया ओपन नॅशनल तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने गोवा राज्य संघटनेच्या वतीने चौथी राष्ट्रीय ओपन तायक्वांदो स्पर्धा पेड्डीएम इंडोअर हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्राची व CISF कन्या रितीका साईनाथ राधिका नार्वेकर (वय १३) हिने क्योरूगी लढतीत एक रौप्य आणि पुमसेमध्ये एक कांस्य पदक पटकावले.
रितीका हिचे वडील साईनाथ नार्वेकर हे केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. रितीका सध्या वास्को, गोवा येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता ९वीत शिकत आहे. तिने पटकावलेल्या दोन्ही पदकांमुळे तिचा सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
गोवा राज्य सरकारचे क्रीडा मंत्री गोविंद गौडे व तायक्वांदोफेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव अॅड. आर.डी. मंगेशकर, भारतीय संघटनेचे निरीक्षक संतोष मोहंती लोडीसा), महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे आयोजन समितीचे सचिव महादेव चव्हाणमहाराष्ट्र संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
अनेक राज्यातील ८०० खेळाडूंचा सहभाग
यजमान गोवा राज्यासह महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राजस्थान, गुजरात, आसाम, ओडिसा, मणिपूर आदी राज्यातील ८०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.