police varata

Online loot of CA in Pune across the country | पुण्यातील सीएची दिल्लीच्या भामट्यांसोबत देशभरात आॅनलाईन लूट

navi-mumbai-cyber-police


नवी मुंबई पोलिसांमुळे महाराष्ट्रातील ४ तर देशभरातील २२ गुन्ह्यांतील सहभाग उजेडात

नवी मुंबई : पुण्यात सीएची नोकरी करताना दिल्लीतील भामट्यांच्या मदतीने देशभरात आॅनलाईन लुटण-याचा पर्दाफाश झाला. ही कौतुकास्पद कारवाई नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळे आरोपी आकाश उमेश पांडे (वय 35, धंदा- नोकरी, रा. ठि- बी/602, गुडविल मिडोज, डॉक्टर डी. वाय. पाटील रोड, लोहगाव, पुणे) याने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, हिजवडी व नागपूरमध्ये व विविध राज्यातील २२ जणांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.

गुन्ह्यासाठी वापरलेली पद्धत

  • सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार मोबाईलद्वारे सहज केला जात आहे. मात्र नागरिकांच्या अर्धवट ज्ञानामुळे आॅनलाईन लुटण्यासाठी आयती संधी आरोपींना प्राप्त होते. याचा प्रत्यय नवी मुंबईच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक पथकाच्या कारवाईमुळे आला आहे. शहरात याच कारणामुळे एका व्यक्तीला १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. यासाठी आरोपीने टेलीग्राम अ‍ॅपचा वापर केला होता. सोशल मीडियावर सर्च करताना फिर्यादी या अ‍ॅपद्वारे 9 आॅगस्ट 2023 आरोपीच्या संपर्कात आले. त्यांना टास्क पूर्ण केल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून त्यांनी तब्बल १७ लाख ६२९ रुपये गमावले. फसवणूक झाल्यााचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी (गुरक्र 04/2023 कलम 420, 34 भादवि सह कलम 66(डी) भारतीय तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 नुसार गुन्हा दाखल केला.

अशी केली कारवाई

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीची पडताळणी केली असता आरोपीने लुटीसाठी आखलेला डाव तपासी पथकाच्या लक्षात आला. त्यानुसार पोलिसांनी पुणे गाठले. लोहगाव येथे सापळा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या. या आरोपींने गुन्ह्यात वापरलेले बँक खाती गोठवण्यात आली असून दिल्लीची लिंक उघडकीस आली आहे

यांच्यामुळे गुन्ह्यांची उकल

ही उत्तम कारवाई नवी मुंबईचे सायबर गुन्हे प्रकटीकरणचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त गुन्हे शाखा अमित काळे, एसीपी विशाल मेहुल, वपोनि गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजू आलदर, अंमलदार विजय आयरे, संदीप सोलाट व अन्य पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!