police varata

Thane police arrest two accused in money laundering case in Uttar Pradesh

देशभरातील ६० नागरिकांची फसवणूक;
मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात दोन आरोपींना ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या

✒️ उदय आठल्ये (पोलीस मित्र)

ठाणे : देशभरातील ६० नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलिसांनी (Thane police) बेड्या ठाेकल्या. या आरोपींनी मनी लॉड्रिंग करून (money laundering) ठाण्यातील एका वृद्धाचीही ८.६५ लाखाची फसवणूक केली आहे..

गुन्ह्याचा तपशील

तक्रारदार सोनाली व्यंकटेशानंद धाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांना क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून “मनी लॉन्ड्रिंग प्रकरण” मिटवण्यासाठी रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा रजि. नं.११७५/२०२४ बी.एन.एस. कलम ३१९ (२), ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क),६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद केला.

तांत्रिक तपास

गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण माने आणि तपास अधिकारी श्री. प्रविण सावंत यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची ओळख पटवली. तपासादरम्यान लखनौ, उत्तर प्रदेश येथून रौचक अजयकुमार श्रीवास्तव (२९) आणि संदिप कमलेशसिंग यादव (२६) यांना अटक करण्यात आली.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक

आरोपींकडून ५ लाख ६५ हजार रुपये रोख, पाच मोबाईल, २० डेबिट कार्ड्स, सहा सिमकार्ड्स, कार, तसेच बँकेचे चेक हस्तगत करण्यात आले. फसवणूक करून लुटलेल्या रकमेचा काही भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.

पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण माने पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रविण सावंत पोलीस निरीक्षक, पोउपनि/जगताप, पोहवा/१४७२ गावडे, पोहवा/१६६२ शिरसाठ, पीना/७१६५ चव्हाण, पोशि/४०४० वाघमारे व मपोशि/४५९५ पटेल या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

Thane Police Commissioner Ashutosh Dumbare

ठाणे पोलिसांची ही यशस्वी कामगिरी जेष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरली असून, नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

👉ठाणे पोलिसांची आणखी चांगली कामगिरी वाचा👈
👇

ऑनलाईन चरस ऑईल, गांजा विकणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!