police varata

Mumbai Lohmarg Police Station

वाचन संस्कृतीचा सुवर्णयुग
मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यात पुस्तक पेढ्यांचे अभूतपूर्व यश

मुंबई : जेव्हा रूची संस्कारित होते, तेव्हा ती अभिरूची बनते, आणि अभिरूचीमधून जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश पडतो. वाचनाच्या सवयीमुळे वैचारिक विस्तार घडतो, जीवनातली समज वाढते, आणि आचरणाला दिशा मिळते. याच महत्त्वपूर्ण विचारांच्या अधिष्ठानावर मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय डॉ. रवींद्र शिसवे यांनी वाचन संस्कृतीला बहर देण्यासाठी अनोखा पुस्तक पेढ्यांची निर्मिती करून पोलिसांसाठी उपक्रम राबविला आहे.

7 हजार 500 पुस्तकांची देणगी

या क्रांतिकारक उपक्रमासाठी आयुक्तालयाने नागरिकांना आवाहन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डोंबिवली येथील पै फ्रेंडस् लायब्ररीचे संचालक श्री. पुंडलिक अनंत पै, ज्यांनी थेट 7 हजार 500 पुस्तकांची मोठी देणगी दिली. त्यांच्या या उदार दानामुळे संपूर्ण आयुक्तालयातील रेल्वे पोलीस ठाणे आणि मुख्यालयात पुस्तक पेढ्या साकारल्या गेल्या आहेत.

आज, हे पुस्तकालय पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी विचारांचे असीम भांडार बनले आहे. या पुस्तकांमधून केवळ ज्ञान मिळत नाही तर एक नवीन दृष्टी, नवी ऊर्जा आणि वर्तनातील प्रगल्भता यांचा मार्गही खुला होतो आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेला हा वाचन संस्कृतीचा दीप प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश टाकत, व्यवस्था सुव्यवस्था कशी बनवावी याची प्रेरणा देत आहे. अशा प्रकारे हा उपक्रम केवळ एक सामाजिक कार्य न ठरता, विचारांची चळवळ बनली आहे.

ही बातमीही वाचा 👇

डोंबिवलीतील वाचन संस्कृतीचा दीपस्तंभ: पै फ्रेंडस् लायब्ररी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!