पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कौतुकास्पद कारवाई
सोलापूर : पंढरपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या २ सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी१० लाख ७० हजार रुपयांच्या १८ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर व सोलापुरात वारंवार दुचाकी चोरीला जात होत्या. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ अर्जुन भोसले, पंढरपूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान गौरव उमेश गायकवाड (वय ३५ वर्षे रा. सरगम चौक पंढरपूर) हे आहिल्या हॉटेल मार्केट यार्ड समोर मोटारसायकल पार्किंग करून जेवन पार्सल आणने कामी हॉटेल मध्ये गेले असता त्यांची होंन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरीला गेली. या प्रकरणाचा शोध घेऊन आरोपी लखन शिवराय लोहार (रा. आळंदी रोड साई कॉम्प्लेक्स दिघी पुणे १५ जि. पुणे) हा भटुंबरे गावामध्ये आल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन त्याला पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने पंढरपूर शहरातून व पुणे शहर, पिंपरी चिचवड, सोलापूर शहरतील १८ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत १० लाख ७० हजार रुपयांच्या मोटारसायकलसह आरोपी लखन शिवराय लोहार, विनोद बळीराम घुले (रा. कल्पना नगर कळंब ता. कळंब जि. धाराशीव) यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, राजेश गोसावी, नागनाथ कदम, सपोफा शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे, सूरज हेंबाडे, सिरमा गोडसे, नितीन पलुस्कर, हवालदार सचिन हबडे, नवनाथ माने, अंमलदार शहाजी मांदळे, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे अंमलदार रतन जाधव यांनी केली आहे.