police varata

ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा ।17 lakh fraud of a woman by forcing her to take out a loan

ठाणे : ऑनलाईन फसवणुकीसाठी भामटे नवनवीन फंडे वापरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ठाण्यातील एका महिलेला चक्क ऑनलाईन १७ लाखांचे लोन काढण्यास भाग पाडण्यात आले.


ठाण्यात राहणारी ३१ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर फोन आला. “तुम्ही तैवान देशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये एमडी, एमए ड्रग्ज सापडले आहे. त्यामुळे तुमच्या विरोधात नार्कोटीक्स विभागात तक्रार करण्यात आली आहे, फोनवर बोलणाऱ्याने सांगितले. कालांतराने एक इसमाने कोटीक्स डिपार्टमेंटचा पोलीस बोलत असल्याचे सांगून व्हेरिफिकेशसाठी स्काईप नावाचे अॅप महिलेला डाउनलोड करण्यास सांगितले आणि व्हिडीओ कॉल करून कायदेशीर कारवाईपासुन वाचण्यासाठी फिर्यादीस नामांकित बँक खात्यातून १७ लाख रुपये रक्कम लोन घेण्यास भाग पाडले. सद रक्कम ऑनलाईन पध्दतीने आरोपीने स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिासांनी (गुन्हा रजि. नं. । ८३९/२४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क), ६६ (ड) भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, आक्षेपार्य सामान मिळाल्याने पोलीस केस झाली आहे, असा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. आपली बँक खात्याची माहिती शेअर करू नका. अनोळखी कॉल, व्हिडीओ कॉल रिसीव्ह करू नका, कोणत्याही वेबसाईट, अॅप लिंक क्लिक करू नका, शेअर्स मार्केट इतर ऑनलाईन योजनात गुंतवणुक केल्यास अधिक नफा देण्याच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन ठाणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!