police varata

खेळण्यातील नोटा व बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या । Shackled to a fraudster with toy notes and fake gold


मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनिय कारवाई

मुंबई : भारतीय चलनातील एक खरी नोट ही भारतीय बच्चो की बँक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहिलेल्या नोटांचा बंडल वापरून लोकांची फसवणूक कऱणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल, नौपाडा, सुरत व अर्नाळा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.


शिवाजीनगर परिसरात एका इसमाकडे खेळण्यातील बनावट नोटा, सोन्यासारखी दिसणारी नकली बिस्कीटे आहेत व त्याचा वापर सदर इसम हा फसवणुकीकरीता वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या पथकाने सापळा लावून नफीस अब्दुल रिफ खान याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपयांच्या १०० नोटांचे ६५० बंडल व २ हजार रुपयांच्या १०० नोटांचा ८५ बंडल आढळले. त्यावर भारतीय बच्चो की बैंक व इंग्रजीमध्ये FULL OF FUN असे लिहिले होते. तसेच सोन्यासारखे दिसणारे नकली १४ बिस्कीटे त्यावर १०० ग्रॅम वजन असे लिहिलेले, एक बेडी, रु. २०००/- दराचे ७ जुन्या भारतीय चलनाच्या नोटा व रु. ५०० दराच्या भारतीय चलनाच्या २५ नोटा असे एकुण २६,५००/- रूपये, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आढळून आला. नफीस अब्दुल रौफ खान याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विलास नवले करीत आहेत.


ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडल ६, हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बापूराव देशमुख, पोनि जब्बार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास नवले, सपोनि भारत जाधव, हवालदार मौरे, मगरे, अंमलदार कारंडे, घारे, मौरे व महिला अंमलदार शिखले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!