police varata

६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अटक। Three people who came to sell whale vomit worth Rs 6 crore arrested

सपोउपनि दत्ताराम भोसले यांच्यामुळे गुन्ह्याची उकल

ठाणे : ६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने केली. या कारवाईत व्हेल माशची उलटी व कार असा ६ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा घटक ३ चे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना खबऱ्याने माहिती दिली की, दुपारी २:०० वाजता काही इसम कारने (कमांक एम एच. ४६-बी. ई-५४२६) मधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी डोंबिवली पूर्व परिसरातील मानपाडा रोडवर असलेल्या मौर्या धाब्याच्या बाजूला येणार आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून कारमधील इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे अनिल राधाकृष्ण भोसले (वय ५५, रा.ठिः- दत्त कृपा सोसायटी चाळ नं. ए/४४, रुम नं.१८, न्यु पनवेल, सेक्टर ६, जि. रायगड), अंकुश शंकर माळी (वय ४५वर्षे, रा.ठिः गांव कासव, मु.पो. आपटा रसायनी, पनवेल, जि. रायगड), लक्ष्मण शंकर पाटील (वय ६३वर्षे, रा.ठिः मु.पो. वांवजे गाव, मोहोदर, ता. पनवेल, एम. आय.डी.सी, तलोजा, नवी मुंबई) अशी सांगितली. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची सहा कोटी वीस लाख रूपयांची व्हेल माशाची उलटी व कार असा एकूण ६ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा रजि नं. १०८५/२०२४ वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम-३९,४४,४८,४९(सी), ५१,५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि संतोष उगल मुगले, सपोनि संदिप चव्हाण, सहा पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार विश्वास माने, विलास कटु, अंमलदार गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!