कोंढवा पोलिसांची उल्लेखनिय कारवाई
२० दुचाकी जप्त
१९ गुन्ह्यांची उकल
पुणे : पुणे शहर व ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणाऱ्या ३ सराईत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या कोंढवा पोलिसांनी केली. या कारवाईत २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोंढवा पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू केली. तसेच सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे अंमलदार संतोष बनसुडे व अंमलदार सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तसेच हवालदार निलेश देसाई यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपींची माहिती मिळवली. त्यानुसार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मागील मोकळ्या ठिकाणी पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन यांनी सापळा लावून गौस मिरासाहब शेख (वय २० वर्षे, धंदा बिगारी, मुळ रा. मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चाजनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे), शाहरुख कासीम शेख (वय २५ वर्षे, धंदा बिगारी, मुळ रा. मु.पो. गुंडपंत दापका, ता.मुखेड, जि. नांदेड सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चा यनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे), जुबेर अहमद मंगरुळे (वय २९ वर्षे, धंदा प्लंबर, मुळ रा. मु.पो. गुडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड सध्या रा. शिवनगरी पार्क, ममता स्वीटचे बाजुला, दिघी, भोसरी) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाहनांबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. या आरोपीतांकडुन २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पेंशन, २ एच एफ डिल्कस आदी दुचाकी चोरल्याची माहिती दिली. तपासादरम्यान चोरलेल्या ७ लाख ३० हजार रुपयांच्या २० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या गुन्ह्यांचा उलगडा
तीनही आरोपींकडून कोंढवा पोलीस ठाण्यातील ९ गुन्हे, हडपसरचे २, भारतीविद्यापीठ २ चे तर वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड या पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस व आंध प्रदेश भागातून दुचाकी देखील चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ५ चे उपायुक्त आर राजा, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन यांनी केली.