police varata

A woman who robbed female passengers going to Konkan was shackled | कोकणात जाणा-या महिला प्रवाशांना लुटणा-या महिलेला ठोकल्या बेड्या

Thane grp

चो-या करण्यासाठी बुलडाण्यातून यायची मुंबईत
ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कारवाईत ३ गुन्ह्यांची उकल

ठाणे : कोकणात जाणा-या मुंबई, ठाण्याच्या महिला प्रवाशांना लुटणाºया सराईत आरोपी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या महिलेच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली असून, २ लाख ६६ हजार रुपयांचे ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सुविधा सुभाष पंगेरकर (वय ६६, रा. . भांडुप प.) या १६ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्र. ७ वरील डाऊन १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगी नं. डी/४ डब्यात चढताना अज्ञात चोराने त्यांच्या शोल्डर पर्सची चेन उघडून सोन्याचे मंगळसूत्राची डबी पळवली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु.र.नं. १०७२/२०२४ कलम ३०५ (३) भारतीय न्याय संहिता) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच प्रकार महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला तसेच शोल्डर पर्सची चेन उघडून मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ८८८/२०२४ कलम ३७९ भा.दं.वि., गु.र.नं. ९४४/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा केला तपास…

वारंवार महिलांचा टारगेट करून लुटालूट करणाºयांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिल्या. त्यानुसार ठाणे लोहमार्ग पोलीस व गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान फिर्यादींना प्रत्यक्ष भेटून चौकशी केली असता तसेच ठाणे रेल्वे स्टेशन तसेच ठाणे शहर हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेºयांच्या फुटेजची बारकाईने तपासणी केली असता एक महिला आरोपी संशयितपणे वावरताना दिसून आली. सदर महिला आरोपीचे देहबोली आणि गुन्ह्याचे कार्यपद्धती वरून तपास पथकाने छत्रपती संभाजी नगर तसेच बुलढाणा येथील खास बातमीदारांना संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज मधील महिला आरोपीची माहिती प्राप्त केली असता ती चिखली (जि. बुलढाणा) येथील असल्याची खात्रीलायक माहिती तपास पथकास प्राप्त झाली.

तपासी पोलिसांचे पथक पोहोचले बुलडाण्यात…

वरिष्ठांचे परवानगीने तपास पथक चिखली, जि. बुलडाणा येथे रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांचे मदतीने सापळ्याचे आयोजन करून महिला आरोपी पुनम शिवराव भोसले (वय २२ वर्षे, रा. ठि. चिखली, जि. बुलडाणा) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता तिने गुन्ह्यांची कबुली दिली. तिची कसून चौकशी केली असता तिने आणखी तिने अशाच प्रकारे केलेल्या आणखी ३ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली.

  • कारवाई करणारे पथक
  • ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त
  • राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहित सावंत, पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सहाय्यक
  • पोलीस उपनिरीक्षक गजानन शेडगे, रविंद्र दरेकर, संदीप गायकवाड, महिला हवालदार सपना शिंदे, पद्मा कॅजळे, सतिश
  • धायगुडे, अनिल खाडे, अमित बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, इम्रान शेख, शशिकांत कुंभार, पोशि/हरिश संदाशिव व
  • सुनिल मागाडे तसेच बुलडाण जिल्ह्यातील चिखली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस अंमलदार
  • राहुल पायगण व प्रशांत धंदर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!