police varata

Mumbai Police busted MD manufacturing factory in Sangli

मुंबई पोलिसांनी सांगलीत एमडी बनवणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश
२५२.२८ कोटींच्या ड्रग्जसह एका महिलेला व ९ पुरुषांना अटक

मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने सांगलीत सुरू असलेल्या एमडी कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत २५२.२८ कोटी रुपयांचे १२६१४१ कि.ग्रॅ. एमडी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून ९ पुरुषांना व एका महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. या कारखान्यात तयार केलेला ड्रग्ज महामुंबईत विकला जात होता.

शहर ड्रग्जमुकतीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाच्या पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व विभागांना अवैध धंद्यांसह कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण विभागांची सर्व पथके आपापल्या परीने विशेष मोहीम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा कक्ष ७ चे पथकाची शोधमोहीम सुरू असताना चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवरील सीएसटी रोडच्या फुटपाथवर सापळा लावून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे ६४१ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) व अंमली पदार्थाचे व्यवसायामधुन मिळविलेले १२.२० लाख व २५ ग्रॅम (कि. अं.रू. १,५०,४२०/-) सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले.

या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. ६७/२०२४, कलम ८ (क), २२(क), २९) गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास युनिट ७ करू लागले. चौकशीदरम्यान तिने एम.डी. देणाऱ्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार मिरा रोड येथील एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६ कोटी रुपयांचे ३ किलो एम.डी. व ३ लाख ६८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्याने हे एम. डी. गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या २ व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपीतांकडे व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून तांत्रिक तपासाद्वारे एम डी. बनविणाऱ्या कारखान्याचा शोध घेतला आणि २५ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत इरळी या गावात धाड टाकली. या कारवाईत २४५ कोटींचे १२२.५०० कि.ग्रॅ. एम.डी. तसेच एम.डी. बनविण्यासाठी वापरणारे साहित्य व वाहन ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये ६ जणंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

ही कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पो.नि. आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक धारणी, पोलीस निरीक्षक उबाळे, पो.उ.नि. रामदास कदम, पो.उ.नि. स्वप्नील काळे, पो.उ.नि. शेलार, पो.उ.नि. परबलकर तसेच सपोनि. माळी (कक्ष-५), स.पो.नि. बिराजदार (कक्ष-४), स.पो.नि. कदम (अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी), पो.उ.नि. रहाणे (कक्ष-६), पो.उ.नि. तावडे (कक्ष-१) तसेच कक्ष-७ चे म.स.फौ. धुमाळ, म.स.फौ. वाहन, स.फौ.सावंत, स.फौ.उबाळे, पो.ह.क्र. ३१३४७/ पवार, पो.ह.क्र. ३२८०७/ गुरव, पो.ह.क्र.३४१७७/ शिंदे, पो.ह.क्र.३४३४४/ बडगुजर, पो.ह.क्र. ९६०१८३/ मोरे, पो.ह.क्र.९६०५५२/ कांबळे, पो.ह.क्र.९६०६३३/ बल्लाळ, पो.ह.क्र.९७०६५१/ जोशी, पो.ह.क्र. ९७०९४४/ शेख, पो.ह.क्र.००३५१/ शिरापुरी, पो.ह.क्र. ००.८२०/ पांडे, पो.ह.क्र.०३४६७/ गलांडे पो.ह.क्र. ०३८३५/ जाधव, पो.ह.क्र. ०४०५६५/ भोई, म.पो.ह. ०५०५५८/ तिरोडकर, पो.ना.क्र.०६१९४०/ राऊत, पो.शि.क्र.०७१०७४/ शिंदे, पो.शि.क्र.०८०५००/ सय्यद, पो.शि.क्र.०८०८७२/ होनमाने, पो.शि.क्र.०९०४६४/सावंत, पो.शि.क्र.०९०५७२/पाटील, म.पो.शि.११२१५३/ शेख, म.पो.शि.१४१२६५/ जाधव, पो.ह.चा. ९८०८०७/ धुमाळ, पो.ह.चा.००६८८/ कदम, पो.शि.चा. १५०८६३/ राठोड, पो.ह. बने, पो.ह. राणे (कक्ष-१२) यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!