आॅनलाईन चरस आॅईल, गांजा विकणाºयाला ठोकल्या बेड्या,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांची कौतुकास्पद कामगिरी
ठाणे : ड्रग्ज विकणाºयांवर कारवायांचा सपाटा लावल्यामुळे तस्करांनी आता आॅनलाईन विक्रीचा मार्ग स्वीकारला, हे ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ५ च्या पथकाच्या | Thane Police Crime Branch | कारवाईमुळे समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके Senior Police Inspector Vikas Ghodke यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. अशा प्रकारच्या तस्करीचा हा पहिलाच गुन्हा संपूर्ण जिल्ह्यात नोंद करण्यात आला आहे. चरस आॅईलद्वारे नव्या पद्धतीने व्यसन करण्यात येत असल्याचे यावरून उघडकीस आले. या कारवाईत ६० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, २९० ग्रॅम चरस व १९ छोट्या बाटल्या चरस (हॅश) आॅईल व अन्य साहित्य असा एकूण ३१ लाख २ हजार २०० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Thane police alert | अशी केली कारवाई
ठाण्यात वाढत्या अमलीपदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क असताना गुन्हे शाखा-वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना ड्रग्जची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वागळे इस्टेट | Wagle Estate परिसरातील इंदिरानगर परिसरातल्या भाजी मार्केटजवळ सापळा लावला. त्यावेळी तेथे आलेल्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव ऋषभ संजय भालेराव (वय २८, रा. रंजनीगंधा सोसायटी, गुजरातीनगर, शहापुर जि. ठाणे) असे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार २०० रुपयांचा ३ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा, १२ हजार ७०० रुपयांचा मोबाईल फोन, काही रोकड असा एकूण ४२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. २६१/२०२४) एन.डी.पी.एस कलम्ट (क), २० (ब) (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
असा करायचा ड्रग्जचा स्पलाय
- चौकशीदरम्यान आरोपी भालेराव याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बदलापूर येथील राहत्या घरातून ६० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, २९० ग्रॅम चरस व १९ छोट्या बाटल्या चरस (हॅश) आॅईल व अन्य साहित्य असा एकूण ३१ लाख २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
- पोलिसांच्या कारवायापासून वाचण्यासाठी ड्रग्जच्या विक्रीसाठी इंन्स्टाग्राम अॅपचा सहारा घेतला होता. मागणीनुसार पैसे आॅनलाईन स्वीकारून कुरिअरद्वारे ड्रग्जची होम डिलीव्हरी करत होता. अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
- हा आरोपी १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत असून मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करत आहेत.
कारवाईमध्ये या सर्वांचा मोलाचा सहभाग
ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदचा चरस आईलच्या तस्करीचा गुन्हा उघडकीस आला असून, ही कारवाई
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले | Additional Commissioner of Police (Crime) Dr. Punjab Rao ugale | पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा निलेश सोनावणे, गुन्हे शाखा घटक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, पोउपनि तुषार माने, सुनिल अहिरे, हवालदार विजय काटकर, जगदीश न्हावळदे, अजय साबळे, सुनिल निकम, संदिप शिंदे, सुशांत पालांडे, रावते, वाघचौरे, मिनाक्षी मोहिते, अंमलदार रघुनानाथ गार्डे, यश यादव यांनी केली.अशा प्रकारे करतात नशा
व्यसनाच्या आहारी गेलेले विविध प्रयोग करत असतात. सध्या चरस आॅईलची नशा वापरली जात आहे. ही नशा करताना सिगारेटला हे आॅईल लावले जाते आणि नशेत गुंग होतात.