police varata

12 lakh fraud of Mumbai businessman। मुंबईच्या व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक

डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी बंगळुरूमध्ये दोन भंगारवाल्यांना ठोकल्या बेड्या

मुंबई : व्यापाऱ्याला केबल वायर, अल्युमिनीयम मेटल स्क्रॅपचा माल देतो, असे सांगून १२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भंगारवाल्यांना बेड्या ठकोण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या डॉ. बी. मार्ग पोलिसांनी बंगळुरूमध्ये केली. या कारवाईमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुंबईचे व्यापारी जुनेद रफिक खान (वय 34) याला बंगळुरूच्या दोन भंगारवाल्यांनी स्वस्त दरात केबल वायर व अल्युमिवीयम मेटल स्क्रॅपचा माल देण्याचे आमिष दाखविले. स्वस्तात माल घेण्यासाठी व्यापाऱ्याने भंगारवाल्यांच्या बँक खात्यामध्ये 24 ते २25 नोव्हेंबर 2022 दरम्यान बारा लाख रूपये ट्रान्सफर केले. पैसे देऊनही माल न मिळाल्याने खान याने डॉ.डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी (गु.र.क. 268/2023)भादंवि कलम-409, 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला.

अशी झाली गुन्ह्याची उकल

तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आरोपींची माहिती समजली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाी पो.उप.नि. विजय गावडे, हवालदार ठेंगले, शिंदे, अंमलदारपाटील, पोळ आदी पोलिसांचे पथक कर्नाटक राज्यात दाखल झाले.

डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांचे पथक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!