police varata

Gun, 10 cartridges seized in Mumbai। मुंबईत बंदूक, १० काडतूस जप्त

आरसीएफ पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

मुंबई : बंदूक, १० जिवंत काडतूस, मॅगझिन बाळगणाऱ्या ( Gun, 10 cartridges seized in Mumbai) प्रकरणी आरोपी पप्पू बाबू मगरे (वय २९ वर्षे), अल्लारखा हजीमीयान शेख (वय २४ वर्षे) यांना अटक केली. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आरसीएफ पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी एक बंदूक, दहा जिवंत काडतुसे व दोन मॅगझीन ताब्यात घेतले आहे.

अशी केली कारवाई

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईत कायदा व सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याकरिता सर्वच विभागांसह स्थानिक पोलीस आपापल्या परीने गैरकृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. अशाच प्रकारे आरसीएफ पोलिसांची विशेष शोधमोहीम सुरू असताना
आर.सी.एफ. पोलीस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकास बंदूक बाळगणाऱ्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक, दहा जिवंत काडतुसे व दोन मॅगझीन आढळल्या. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१), १३५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

यांनी केली गुन्ह्याची उकल…

या गुन्ह्याची उकल पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपुत, ट्रॉम्बे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मोहीते, गुडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांढरे, अंमलदार राउत, सानप, टिकोणे, हवालदार पाटील, पोलीस नाईक मोकल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!