police varata

Swami’s footsteps at the police house । पोलिसाच्या घरी स्वामींची पावलं

बाळासाहेब यादव कुुटुंबियांची यंदाची दिवाळी ठरली खास!

नवी मुंबई : दरवर्षी येणारी दिवाळी प्रत्येकासाठी खास ठरत असते. हा प्रसंग यंदा बाळासाहेब यादव या पोलीस कुटंबियांच्या वाट्याला आला. दिवाळीची जय्यत तयारी सुरू असताना अचानक स्वामी समर्थ माऊलींच्या पादुका आपल्या घरी येणार, असा फोनवर निरोप मिळाला आणि सबंध कुुटुंब आनंदी झाले.

सद्गुरू श्री साटम महाराज दानोली-सावंतवाडी यांचे शिष्य श्री अवधुत साटम स्वामी यांनी यादव परिवाराच्या कळंबोली येथील तिरुपती काँम्प्लेक्स, डी -३०४ येथील राहत्या घरी रविवार १२ नोव्हेंबर  रोजी सकाळी ११ वाजता ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रसाद पादुका आणल्या.

पादुकांचे औक्क्षण

सोसायटीच्या आवारात यादव परिवार आणि रहिवाशांनी स्वामींच्या पादुका पालखीत ठेवून औक्क्षण केले व टाळमृदंग, श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करत स्वामींची पावलं यादव परिवाराच्या घरी आली. विधीवत पूजाविधी करण्यात आला. ज्याला स्वामी पादुका आल्याचे समजत होते तसतसे भक्तगण दर्शनासाठी यादव यांच्या घरी येत होते. दिवसभरात अनेकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेत यंदाची दिवाळी आनंदात साजरी केली.

या भक्तांची विशेष उपस्थिती

या भक्तिमय प्रसंगी स्वामीभक्त सेविका सौ. माधुरी गोसावी ताई श्री स्वामी समर्थ मठ कळंबोली मठाधिपती तसेच स्वामीभक्त श्री दिपक भोगले साहेब (RETIRED PSI), स्वामी सेवक श्री गणंजय रहाटे यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!