police varata

4 Bangladeshis arrested in Mumbai

मुंबईत ४ बांगलादेशींना अटक;
युनिट ६ चे अंमलदार संभाजी कोळेकर यांच्यामुळे गुन्ह्याची उकल

मुंबई : बॉलीवूड स्टार सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ल्यात बांगलादेशी नागरिकाचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशींवर (Bangladeshis) कारवाईसाठी विशेष मोहिम राबवली. या अंतर्गत तपास सुरू असताना मानखुर्द परिसरातील शिवशक्ती चाळ, महाराष्ट्र नगर नंबर ३, शांतीनगर, रहिवासी सेवा संघ येथून ४ बांगलादेशींना अटक करण्यात आली. ही कारवाई अंमलदार संभाजी कोळेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) युनिट ६ च्या पथकाने केली.

या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ( गु.र.क्र. 38/2025, कलम नियम 3, 6 पारपत्र ( भारतात प्रवेश) नियम 1950 सह कलम 12 (1)(ब) पारपत्र अधि 1967 सह कलम 3 (1) परकीय नागरीक आदेश 1948 सह कलम 14 (अ), 14(ब) परकिय नागरीक कायदा-1946 (डीसीबी सीआयडी वि.स्था.र.क्र. 8/2025) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे
1) शाआलम मो.शरीफ (३९, धंदा-मच्छी विक्री, रा.ठि. महाराष्ट्र नगर नंबर ३, शांतीनगर रहिवासी सेवा संघ मानखुर्द, मुंबई)
२) मजान मोहम्मद शरीफ (२४, राहणार – वरील प्रमाणे. (बांगलादेश येथील पत्ता- गाव-छोटा शेकाटी, ठाणा कोतवाली , जशोर, बांगलादेश)
3) रजिया हुसेन सय्यद (२७, पत्ता. छोटा कॉलनी, जशोर, बांगलादेश)
4) कुलसुम अजिज शेख (२७, पत्ता. छोटा कॉलनी, जशोर, बांगलादेश)

ईमो अॅपद्वारे बांगलादेशात फोनाफोनी

Phone calls in Bangladesh via the imo app
कारवाई केलेले बांगलादेशी महिला व पुरुष मोबाईलमधील इमो अॅपलिकेशनद्वारे बांगलादेशातील नातेवाईक व मित्रांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्ना झाले आहे. हे आरोपी भारतात कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, चिकणे, पोलीस उपनिरीक्षक रहाणे, सकपाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देसाई, हवालदार भालेराव, अंमलदार कोळेकर, पाटसुपे, महिला अंमलदार अभंग, सरोदे, हवालदार डाळे व पाटील यांनी केली.

खालील बातमीही वाचा👇

👉 खुन, खुनाचा कटातीला आरोपीला आश्रय देणाऱ्या मुख्य आरोपीसह ५ जणांना अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!