झटपट श्रीमंतीची जाहिरात आली अंगलट;
सोने चोरून जंगली रम्मी खेळणारा गजाआड;
आरोपीला पुण्यात अटक
✒️ उदय आठल्ये
मुंबई : टीव्ही व सोशल मीडियावर झटपट श्रीमंत होण्याची जाहिरात तरुणाच्या अंगलट आली. योगेश चव्हाण (रा.चाकण, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये पुणे ते कल्याण प्रवासादरम्यान लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज पळवला. हा ऐवज विकून त्याने जंगली रम्मी या ऑनलाईन जुगारात पैसे लावले. त्याला पुण्यातून कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक केली.
राहुल सुहास सोनी (वय 33, रा. सातरस्ता, सोलापूर) हे कामानिमित्त सोलापुर रेल्वे स्टेशन येथुन अप सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापुर ते कल्याणदरम्यान कुटुंबियांसह प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या आईने शोल्टरपर्स बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेवर ठेवली. दरम्यान, त्यांना झोप लागली. हीच संधी साधून चोराने त्यांची पर्स पळविली. त्यात ७ लाख ७०हजार रुपयांचे सोन्याची लगड होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी (गु.र.नं. 1993/2024 कलम 305 (C) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तपासादरम्यान हाती लागलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झले. चाकण परिसरातून योगेश चव्हाण याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार रविंद्र ठाकूर करीत आहेत.
ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मध्य परिमंडळ पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, सपोनि मंगेश खाडे (सायबर सेल) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट येथील पोलीस उप निरीक्षक, प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार रविंद्र ठाकुर, प्रमोद दिघे, लक्ष्ण वळकुंडे, अजय रौंधळ, सौ. स्मीता वसावे, राम जाधव, वैभव जाधव, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रुूपेश निकम, सायबर सेलचे अंमलदार विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे, संदेश कोंडाळकर तसेच RPF-CPDS पथक, पुणे येथील SI दादासाहेब लाड, ASI विशाल मोरे, CT-विशाल माने, सय्यद रसुल यांनी केली.
रेल्वे प्रवाशांना आवाहन!
डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयक्त, मुंबई लोहमार्ग
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस कायम सतर्क असतात. सुजान प्रवासी या नात्याने प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान मुद्देमालाची काळजी घ्यावी. प्रवासादरम्यान मदतीसाठी १५१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केेले आहे.