मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा कक्ष- २ ची यूपीत कारवाई
Police varta News Network
मिरा रोड : उत्तर प्रदेश राज्यातून (यूपी) (Uttar Pradesh State) बेकायदेशीर पिस्टल, काडतुसांच्या सुरू असलेल्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. ही कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. या कारवाईत अटक केलेल्या ९ आरोपीतांकडून ३ लाख ८३ हजार ३०० रुपयांची ९ देशी पिस्टल, २१ जिवंत काडतुसे व ५ मोबाईल जप्त करण्यात आले.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या (Mira-Bhainder, Vasai-Virar Police Commissionerate) परिसरातील अवैधरीत्या पिस्तूल बाळगणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये (ips Madhukar Pandye) यांनी सर्वच पोलीस विभागांना दिले. त्यानुसार गुन्हे शाखेची शोधमोहीम सुरू असताना कक्ष २ च्या पथकाला पिस्तूल बाळगणाऱ्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वसई कोळीवाडा ते सुरुचीबागकडे जाणाऱ्या मार्गावरील सनटेक सिटी गेटचे समोरील अर्धवट बांधकाम असणाऱ्या तीन मजली बिल्डींग (ता. वसई, जि. पालघर) येथे सापळा लावून आरोपी मोइन ऊर्फ जिलेबी अब्युबयान सयद (वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्टल व ३ जीवंत काडतूस आढळले. बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. १७४/२०२४) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ (१) (ब) सह महाराष्ट्र पोलीस अधि. १९५१ चे कलम ३७(१)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीची कसून चौकशी केली असता अवैध पिस्तूल खरेदी करणारे व पुरवणा-या उत्तर प्रदेश या राज्यातील आरोपींची माहिती समजली. त्यानुसार संबंधित ठिकाणांवरून ८ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींची नावे
1) मोइन ऊर्फ युनुस ऊर्फ जिलेबी अच्युबयान सैयद, (वय ३० वर्षे, धंदा गैरेज रा. दमानिया अपार्टमेंट, तळमजला, कोळीवाडा वसई ता. वसई जि. पालघर)
2) जावेद इकबाल खान, वय 36, चांदा बिल्डिंग, रा.घर नं.604, साईदत्त नगर, वसई कोळीवाडा, वसई पश्चिम, ता. वसई जि. पालघर,
3) मोहम्मद आरीफ ऊर्फ शाहरुख युसुफ खान, वय २९ वर्षे, धंदा डिलीव्हरी, रा.एफ सेक्टर, टी लाईन, रुम नं.०५, चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई ४०००८८
4) अंकित रामभुजारथ निशाद उर्फ अंकित पटेल वय १९ वर्ष धंदा शेती रा. हडही, ता. साहगंज, जिल्हा- जौनपुर, पोलीस ठाणे – सराईख्वाजा, राज्य उत्तर प्रदेश
5) अमित विजय निशाद सध्या, रा. गणेश नगर, वडोदरा, राज्य गुजरात मुळ गाव- मिरसातपुर, पो बदलापूर, ता. जि. जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश
6) अमितकुमार महाजन निशाद वय २४ वर्ष सध्या. रा. सध्या कृष्णअपार्टमेंट, रुम नं ६०२सघर्षनगर, चांदीवली, अंधेरी पूर्व मुळ गाव – पट्टेदयाळ, पो बदलापूर, ता बदलापूर, जि. जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश
9) आलम उर्फ अलीम झुलकरनैन खान वय २८ वर्ष रा. रुम नं ०८, काझी चाळ, किस्मत नगर, कुर्ला पश्चिम, मुंबई
9) देवा अजयकुमार प्रजापती, वय २३, व्यापारी, रु. प्रजापती बस्ती, नेवाडा मुखलिसपूर, ता. बदलापूर, जि. जौनपूर, राज्य उत्तर प्रदेश
कारवाई करणारे पोलीस पथक । Police Squad
ही कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-२ वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनिरी सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, पोउपनि अजित गिते, सपोउपनि रमेश भोसले, संजय नवले, हवालदार रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर, अंमलदार अजित मैड, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड, महाराष्ट्र सुरक्षा बलचे रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, शुभम गावकवाड व सायबर गुन्हे प्रकटीकरणचे सपोउपनि संतोष चव्हाण यांनी केली.