police varata

5 people arrested, for sheltering the accused in the murder and murder conspiracy

खुन, खुनाचा कटातीला आरोपीला आश्रय देणाऱ्या मुख्य आरोपीसह ५ जणांना अटक

✒️ उदय आठल्ये

सातारा : खून, खुनाचा कट या गुन्ह्यातील आरोपीला आश्रय देणाऱ्या मुख्य आरोपीसह ५ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकांनी केली.

२ जानेवारी २०२५ रोजी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गणपत शेलार याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी रजि.नं.०१/२०२५ भा.ना.सु.संहिता २०२३ चे कलम १९४ चे नुसार अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. १५ जानेवारी रोजी यातील मयताची पत्नी नामे रसिका संजय शेलार हिने मेढ़ा पोलीस ठाणे येथे दिले फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंद करुन तपास करण्यात आला असता सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करुन संजय शेलार याचा खुन करणारा रामचंद्र तुकाराम दुबळे याला १६ जानेवारी २०२५ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, अरुण बाजीराव कापसे याच्या सांगण्यावरुन संजय शेलार याचा खून केला. संजय याचा खुन करण्यासाठी अरुण कापसे, रामचंद्र दुबले व विकास सावंत यांनी मिळून खुनाचा कट रचल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार १८ जानेवारी २०२५ रोजी विकास अवधुत सावंत (३५, व्यवसाय-बाऊन्सर, रा. आगलावेवाडी ता. जावली जि. सातारा) याला अटक करण्यात आली .
या गुन्ह्याचा तपास अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपासाकरिता चार पथके नेमली. मुख्य अरुण बाजीराव कापसे याला मिरज येथून अटक करण्यात आली. अरुण याला पळून जाण्यासाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांना २२ जानेवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. असून आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २८ जानेवार २०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.नि. जितेंद्र शहाणे, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अमोल गवळी, पोउपनि पांगारे, पोउपनि शिंगाडे, पोउपनि सुधीर वाळुंज तसेच मेढा व वाई पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!