नशामुक्त कराडसाठी ३ हजार जण धावले
पोलीसांच्या नियोजनातून पहिली मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण
– उदय आठल्ये
सातारा : नशामुक्त कराडसाठी आयोजित मॅरेथॉमनमध्ये ३ हजारांपेक्षा अधिक स्पर्धक धावले. सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या माध्यमातून आयोजित केलेली पहिलीच मॅरेथॉन कराड येथे संपन्न झाली. हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या नियोजनाने व कराडमधील नागरिक, सामाजिक संस्था यांचे संयोजनाने पोलीस रन २०२५ नशामुक्त कराड अभियानांतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत ५ कि.मी. व १० कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा रविवारी कराड येथे जोशपूर्ण व उल्हासमय वातावरणामध्ये पार पडली.
कराड येथे पोलीस विभागामार्फत सदर मॅरेथॉन ही युवक व युवतींना नशा व नशिली पदार्थापासुन परावृत्त करण्याचे हेतुने आयोजित करण्यात आलेली होती. शारिरीक स्वास्थ्य व तंदरुस्त जिवनशैली अंगिकारण्याकरीता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येवुन काम करण्याची गरज असल्याचे या सामाजिक हेतुने सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये १८ वर्षापर्यंत, १९ वर्षे ते ४५ वर्षे व ४५ वर्षांपेक्षा जास्त असे ३ वयोगट करण्यात. आले होते. विविध गटातील विजेते झालेल्या एकुण ३६ स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देवुन गौरविण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये निरोगी आरोग्याचे महत्व अधोरेखित करताना, उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल कराडवासियांचे आभार मानले. तसेच कराड पोलीस मॅरेथॉन उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये पथदर्शक उपक्रम ठरेल असा आशावाद व्यक्त केला व यानंतर कराड मॅरेथॉनचे दर्जावर्धन करुन पुढील वर्षापासुन हाफ मॅरेथॉन घेण्याचा मानस बोलुन दाखविला. डॉ. सुरेश बाबा भोसले यांनी देखील पोलीस दलाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
मॅरेथॉनमध्ये पोलीस ग्राऊंड येथे एक्सपोची व्यवस्था करण्यात आलेली होती. विविध स्टॉलचा स्पर्धकांनी आनंद घेतला. सहभागी स्पर्धकांना अल्पोपहार, फिजिओथेरपी इ.ची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. सहभागी स्पर्धकांचे मनोजरंजन व उत्साह वाढविण्याकरीता मुंबई येथील लाईव्ह बॅन्डची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच वैदयकीय अधिकारी यांची तीन पथके तैनात होतो. या मॅरेथॉन करीता इंडीयन मेडीकल असोशिएशन, कृष्णा विश्व विदयापीट, पार्श्वनाथ बैंक, संगम हेल्थ क्लब सेंटर्ड ट्रेकींग ग्रुप, पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.
एकंदरीत या स्पर्धेचे संपुर्ण नियोजनामध्ये मा. श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राजु ताशिलदार, श्री. महेंद्र जगताप, सपोनि श्री. अमित बाबर, श्री. रविंद्र भोरे, सपोनि श्री. किरण भोसले, सपोनि श्री. आदिनाथ खरात, सपोनि श्री. माळी, पोउनि श्री. साक्षात्कार पाटील, पोलीस अंमलदार संतोष सपाटे, संताजी जाधव, असिफ जमादार, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, दिपक कोळी, सागर बर्गे, मयुर देशमुख, अनिकेत पवार, राजाराम बाबर, मानतेश कोळी, वैभव पवार, दिपाली पाटील, आरसीपी पोलीस जवान असे सुमारे १५० पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी बंदोबस्त पार पाडला. सपोनि संदिप सुर्यवंशी यांचेकडुन मॅरेथॉन मार्गावरील वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते.