Site icon police varta

20 lakh found in railway। हे २० लाख रुपये कोणाचे?


धावत्या रेल्वेत सापडलेली पैशांनी भरलेली बॅग

कल्याण : रेल्वे प्रवासादरम्यान २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली आहे. एका सज्जन प्रवाशांनी ही बॅग कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.

२२ सप्टेंबर २०२४ रोजी २१.५७ वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून अप सीएसएमटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशांना बेवारस बंग विना मालक मिळून आल्याने ती पोलीस ठाण्यात हजर केली. सदर बॅगेची तपासणी दोन पंचांसमक्ष केली असता त्यामध्ये एकूण २०,००,०००/- रोख रुपये, एक Reebok कंपनीची बॅग, त्यामध्ये ५००/- रुपये रोख दराचे ०७ बंडल, एक औषधांचे चार कप्पे असलेला बॉक्स असे मिळून आल्याने सदरची बेवारस बॅग पंचनाम्यातंर्गत जप्त करण्यात आलेली आहे.
बेवारस बॅगेच्या मालकाचा तपास रविंद्र शिसवे, मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मनोज पाटील, पोलीस उप आयुक् बुधवंत, सपोआ, कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पंढरी कांदे, वपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि खेतमाळीस हे करीत आहेत.

Exit mobile version