Site icon police varta

2 crore 30 lakh cash seized in Bhiwandi । भिवंडीत २ कोटी ३० लाखांची रोकड जप्त

एसीपी सचिन सांगळे यांच्यासह शांतीनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

Police varta News Network

भिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका ते मानकोलीदरम्यान एका गाडीतून २ कोटी ३० लाख १७ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई विधानसभा निवडणुकी २०२४ च्या (Assembly Election 2024) अनुषंगाने सतर्क असलेल्या एसीपी सचिन सांगळे व शांती नगर पोलीस ठाण्याचे (Shanti Nagar Police) सपोनि घोलप, अंमलदार चव्हाण, लोखंडे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची पथके व राज्य पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मतदानाच्या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे वाटप, भेटवस्तू देण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आदर्श आचारसंहिताचे पालन होण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिस संशयित वाहनांची झडती घेत असताना एका गाडीत एसीपी सचिन सांगळे व शांती नगर पोलीस ठाण्याचे सपोनि घोलप, अंमलदार चव्हाण, लोखंडे यांना २ कोटी ३० लाख १७ हजार ६०० रुपये आढळले. या रकमेबाबात चालक महेंद्र पांडे याच्याकडे काहीएक कागदपत्रे नव्हती.

पुढील कारवाईसाठी गाडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात आणण्यात आली. तेथे एफ. एस.टी. क्रमांक ६,१३७ भिवंडी पूर्व विधानसभाच्या (Bhiwandi East Assembly) पथकाचे सहाय्यक खर्च निरीक्षक शरद यादव, एमसीसी नोडल ऑफिसर गुरव, आयकर (income tax) निरीक्षक पवन कौशिक यांना तात्काळ माहिती देऊन सदर ठिकाणी पाचारण केले. या रकमेबाबात कोणतीही कागदपत्रे नसल्याने ही रक्कम जप्त करून आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Exit mobile version