Site icon police varta

तासवडे टोलनाक्यावर १५ लाख रुपयांची रोखड जप्त। 15 lakhs cash seized

तळबीड पोलिसांची उत्तम कामगिरी

उदय आठल्ये

सातारा : तासवडे टोलनाका येथील राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या तळबीड पोलिसांनी केली.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषांगाने आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. याचे काटेकोरपण पालन होण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. अशाच प्रकारे तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी करून पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी महिंद्रा बोलेरो गाडीत १५ लाखांची रोकड आढळली. याबाबत गाडीतील दोन इसमांची चौकशी केली असता ते अहमदाबाद (गुजरात) येथे राहणारे असुन ते बंगळुरू येथे जात होते. त्यांचा औषध, गोळ्या तयार करणारी मशीन बनवण्याची व विक्रीची कंपनी असुन त्यातील मशीन ही लाईफ केअर अमेरिका येथील कंपनीचे मालक राजेंद्रकुमार सुबुध्दी यांना आमची मशीन विक्री करणार असुन त्यांचे बेंगलोर येथील एम्पोलॉई विख्यात कुमार नायर यांचेशी त्याबाबत व्यवहार झाला झाला आहे. त्याचीच ही रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी रोकडबाबत वरिष्ठांना माहिती दिली. तसेच सदर रक्कम ही भरारी पथका समक्ष व्हीडीओ चित्रीकरण करून ताब्यात घेवुन ट्रेझरीमध्ये सुरक्षीरित्या ठेवण्यात आली. या प्रकरणात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करीत आहोत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, हवालदार भोसले, पोलीस नाईक दिक्षीत, अंमलदार मोरे, राठोड, कुमार, गायकवाड महिला अंमलदार कुंभार, सत्रे यांनी केली.

Exit mobile version