police varata

२० वर्षांपासून आरोपीला ठोकल्या बेड्या ।The accused has been shackled for 20 years


हवालदार सुभाष मोरेंची कौतुकास्पद कामगिरी
मुंबई गुन्हे शाखा ७ ची ठाणे जिल्ह्यात कारवाई

मुंबई : गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात बेड्या ठोकल्या. ही उत्तम कारवाई हवालदार सुभाष मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या आरोपीला पुढील तपासासाठी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आयुब मोहंमद सलीम शेख (रा.ठि-कमलरमन झोपडपटट्टी साइबाबा मंदिाच्या मागे, बैगणवाडी, गोवंडी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
१९९८ साली मुलुंड पोलिसांनी गु.र.क्र. 227/1998, कलम 379 भादंवि नुसार गुन्हा दाखल करून आरोपी आयुब मोहंमद सलीम शेख याला अटक केली. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी, 27 वे न्यायालय, मुलुंड, मुंबई. यांचे न्यायालयात चालू होता. मात्र आयुब हा नमुद गुन्हयाचे सुनावणीच्या वेळी मा. न्यायालयात उपस्थित राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला २००४ पासून फरार घोषित केले होते. दरम्यानच्या काळात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेऊ लागली.
गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकची विशेष शोधमोहीम सुरू असताना २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीची माहिती हवालदार सुभाष मोरे यांना प्राप्त झाली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता आरोपी ठाणे, पनवेल दरम्यान येत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी कळवा परिसरात पाळत ठेवली. आरोपी आयुब शिवशंकर चाळ, भास्कर नगर, पारसिक बोगदयाजवळ, कळवा येथे येताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बळगी, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, पोलील उपनिरीक्षक रामदास कदम, पोलस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक नामेदव परबळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निधी धुमाळ, हवालदार पवार, हवालदार मोरे, अंमलदार होनमाने, सावंत, राठोड यांनी केली.

आरोपीचा पोलीस रेकॉर्ड
1) मुलुंड पो. ठाणे गु.र.क्र.227/1998 कलम 379 भादवि
2) मुलुंड पो. ठाणे गु.र.क्र.213/1998 कलम 379 भादवि
3)देवनार पो. ठाणे गु.र.क्र.02/2018 कलम 8(क), 22,29 एन.डी.पी.एस. कायदा.
नमुदचा फरार आरोपी हा देवनार पो. ठाणे देवनार पो. ठाणे गु.र.क्र.02/2018 कलम 8(क), 22,29 एन.डी.पी.एस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!