Site icon police varta

सराईत दुचाकी चोर जेरबंद। two-wheeler thief jailed

वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कारवईत ५ मोटारसायकल जप्त

उदय आठल्ये

सातारा : मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत ५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

१६ ऑक्टोबर २०२४ रोजी वाईतील मौजे रविवार पेठ येथून होंडा स्पेल्डर गाडी चोरीस गेल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंद दाखल करण्यात आला. तसेच अॅक्टीव्हा गाडी परशुरामनगर या ठिकाणाहून चोरीस गेली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गु.र.नं २८९/२०२४ प्रमाणे तर एमएसईबी कार्यालया समोरून रेझर स्कुटर गाडी चोरीला गेल्याबाबत वाई पोलिसांत गु.र.नं २९३/२०२४ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

एकामागोमाग एक मोटारसायकल चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही बाब लक्षात घेत चोरांच्या त्वरित मुसक्या आवळण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वाई शहारातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्यासह वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अंमलदार शहरात गस्त घालत असताना परखंदी रोड येथे ओढ्याचे कडेला एक संशयित इसम विना नंबर प्लेटची गाडी घेऊन फिरतांना दिसून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अॅक्टीव्हाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. चौकशीदरम्यान त्याने स्वत:चे नाव गणेश धनराज पिल्ले (रा कोंढावळे ता. वाई जि. सातारा) असे सांगितले. त्याने वाई शहरातुन ५ गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने ३ लाख ५० हजार रुपयांची ५ वाहने वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने आरोपीकडून हस्तगत केली आहेत.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अंमलदार विशाल शिंदे, अंमलदार राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, रुपेश जाधव, राम कोळेकर यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version